दिग्दर्शक एस.एस. राजामौली (S S Rajamouli)यांच्या ‘आरआरआर’ (RRR)या ऐतिहासिक चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये ज्युनियर एनटीआर,(Junior NTR) राम चरण(Ram Charan), आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि अजय देवगण(Ajay Devgan) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘आरआरआर’ हा २०२२ च्या सगळ्यात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘जननी’ हे गाणं (Janani Song Out) नुकतंच रिलीज करण्यात आले आहे. जननी गाण्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.‘आरआरआर’ हा चित्रपट ७ जानेवारीला तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळणार आहे.