धनंजय मुंडेंवर झालेले बलात्काराचे आरोप आणि नवाब मलिकांच्या जावयाला झालेली अटक यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला प्रश्न विचारले जात आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील(jayant patil) यांनी यासंदर्भात नुकतीच मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, दोन्ही विषयावर मी कमेंट करणार नाही कारण दोन्ही विषय पोलिसांकडे आहेत त्यामुळे आम्हाला पोलिसांवर दबाव आणायचा नाही. निरपेक्षपणे चौकशी व्हायला हवी.