दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित ‘जयंती’ (Jayanti)हा सिनेमा येत्या १२ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘तुझी लवशीप देशील का? ’(Tujhi Loveship Deshil Ka Song) हे गाणं(Jayanti Movie Song Release) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.गुरू ठाकूर(Guru Thakur) यांनी हे गाणं लिहिलं असून मंगेश धाकडे या गाण्याचे संगीतकार आहेत. सुहास सावंत यांनी हे गाणं गायलं आहे. ऋतुराज वानखेडे(Ruturaj Wankhede) आणि काजल चावला(kajal Chawla) यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे.