बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor In Jersey Movie)‘जर्सी’या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. आता ‘जर्सी’ या चित्रपटाचा ट्रेलर(Jersey Trailer Release) प्रदर्शित झाला आहे. ‘कबीर सिंग’नंतर शाहिद दुसऱ्यांदा तेलुगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये (Remake Of Telugu Movie)मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला शाहिद एक क्रिकेटपटू असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण काही कारणास्तव तो क्रिकेट खेळणे सोडून देतो. त्यानंतर मुलाला नवी जर्सी घेऊन देण्यासाठी तो प्रयत्न करत असल्याचे दिसते. सध्या सोशल मीडियावर ‘जर्सी’ चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा आहे.