गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचा जोर वाढत असून पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील जोगेश्वरी विद्यालय (Jogeshwari School Damged By Rain)सावरकुटे अक्षरशः भुईसपाट झाले आहे. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने जीवितहानी टळली.