खिसा’ या लघुपटाने ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात नॉन फिचर फिल्ममधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण पुरस्कार पटकावला आहे. या लघुपटाचं दिग्दर्शन राज मोरे यांनी केलं असून लेखन कैलास वाघमारे यांनी केलं आहे. आतापर्यंत ‘खिसा’ या लघुपटाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे.