‘झिम्मा’(Jhimma)चित्रपटाच्या शीर्षक गीताला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. असे असतानाच ‘माझे गाव’ हे  झिम्मा(Majhe Gaon Song From Jhimma) चित्रपटातील वेगळ्या धाटणीचे गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले असून अपेक्षा दांडेकर यांनी हे गाणे गायले आहे. ‘कुठल्या नभाच्या पार आहे माझे गाव’ असे या गाण्याचे शब्द असून हे गाणे प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावते. हे गाणे ऐकताना आपले मन अतिशय शांत होते. विचारांचा वेग मंदावतो आणि ओठांवर मंद हास्य उमटते. ही या गाण्याची जादू आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ चित्रपट १९ नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित(Jhimma Release Date) होत आहे.