नारायण राणे यांना आमचा पाठिंबा असल्याचे विनोद तावडे यांनी म्हटले आहे. आज ते राज्यपालांच्या भेटीला गेले असता, माध्यमांना सामोरे जाताना या घटनेचा निषेध सुद्धा केला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर झालेली कारवाई बेकायदेशीर आणि घटनेच्या विरोधातली आहे. आमचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीसुद्धा ट्विट करून ही कारवाई घटनेच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.