भारतात आजपासून कोरोना लसीकरणाला(corona vaccination in India) सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांचं अभिनंदन केलं. भारतीयांनी कोरोना काळात अनुभवलेल्या प्रसंगांची आठवण काढली. यावेळी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कोविड योद्धे आणि इतर नागरिकांविषयी बोलताना पंतप्रधान मोदी यांना गहिवरून आले.(narendra modi gets emotional) त्यांचा कंठ दाटून आला.