काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ viral होतो आहे. व्हिडिओत प्रियांका गांधी स्वत: आपल्या कराची काच साफ करताना दिसत आहेत. काँग्रेसने हा व्हिडिओ स्वत: आपाल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केला आहे. हा व्हिडिओ प्रियांका गांधी उत्तर प्रदेशातील रामपूरच्या रस्त्याने शेतकरी ट्रॅक्टर रॅलीमध्ये मृत्यू झालेल्या नवरीत सिंह यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी जात होत्या. त्यावेळचा हा व्हिडिओ आहे.