श्रीकृष्ण जन्माष्टमीला(Shreekrishna Janmashtami) दहीहंडी(Dahihandi) उत्सव आम्ही धूम धडाक्यात साजरा करणार आहोत, असे भाजप आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे. हिंदू उत्सव विरोधी कोणताही महाराष्ट्र सरकारचा(Maharashtra Government) निर्णय आम्हाला मान्य नाही. सरकारने दारुची दुकाने उघडली पण मंदिरे नाही, त्यामुळे दहीहंडी उत्सव धूम धडाक्यात साजरा करणार असल्याचं राम कदम यांनी सांगितलं आहे.