रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांची जीभ पुन्हा घसरली आहे. दानवेंनी राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्याविषयी आक्षेपार्ह टीका केली आहे. सध्या राहुल गांधी यांना कोणतेही काम नसल्यामुळे ते विकासाच्या आड येत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामात अडथळा निर्माण करत आहेत, त्यामुळे ते निरुपयोगी बैलाचे(Useless Bull) काम करत आहेत, असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे, रावसाहेब दानवे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.