बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानने त्याचा बहूचर्चित ‘राधे’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मसह थिएटरमध्ये देखील रिलीज करण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांना दिलेली कमिटमेंट पूर्ण करणाऱ्या सलमानने मात्र थिएटर मालकांना दिलेली कमिटमेंट पूर्ण केली नाही. यासाठी त्याने थिएटर मालकांची माफी मागितली आहे.