बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने(John Abraham) ‘सत्यमेव जयते २’ (Satyameva Jayate 2)या चित्रपटाचं प्रमोशन सुरु केलं आहे. या चित्रपटामध्ये जॉन अब्राहमसोबत दिव्या खोसला कुमार(Divya Khosla Kumar) मुख्य भूमिकेत आहे. सत्यमेव जयते २ हा चित्रपट २५ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. नुकतेच या चित्रपटातील पहिलं गाणं ‘मेरी जिंदगी है तू’ (Meri Zindagi Hai Tu Song)प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मनोज मुंतिशर यांनी हे गाणं लिहिलं असून नीती मोहन, रोचक कोहली आणि जुबिन नॉटियाल यांनी हे गाणं गायलं आहे. गाण्यामध्ये जॉन आणि दिव्याची जोडी खूप सुंदर दिसत आहे. तुम्हीपण बघा हे नवं गाणं.