इंडियन आयडलच्या बाराव्या पर्वाचे व्यासपीठ गाजवणाऱ्या सायली कांबळेच्या स्वप्नवत प्रवासाला आता सुरूवात झालीय. सायलीचे इंडियन आयडल संपताना सिनेसृष्टीत पदार्पण करायचे स्वप्न पूर्ण झाले. फिल्ममेकर जो राजन दिग्दर्शित 'कोल्हापूर डायरीज' ह्या चित्रपटासाठी सायलीने नुकतेच गाणं गायलं आहे.