नवी मुंबई : शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) रोजी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित फ्लेमिंगोंच्या संख्येत वाढ झाली आहे. वाशी येथील खाडी परिसरात स्थालांतरित फ्लोमिंगो मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. दरवर्षी मुंबईत फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. हे फ्लेमिंगो इराण येथून हजारो मैलांचा प्रवास करून मुंबईत येतात. खाडी परिसरात येणारे फ्लेमिंगो पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.