Google लवकरच मोबाइल सर्च रिझल्ट साठी नवीन डिझाइन तयार करणार आहे. कंपनी मोबाइलसाठी सर्च इंजिन इंटरफेस पुन्हा नव्याने डिझाइनवर काम करत आहे. द वर्ज (The Verge) नुसार, रिडिझाइनचे नेतृत्व एलेयन चेंग (Aileen Cheng) करत आहेत. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आम्ही सर्च इंजिन अधिक सुलभ करणार आहोत, कारण युजर्सला लवकरात लवकर आणि सहजतेने गोष्टी शोधणं सोपं होईल. तर वर्ज नुसार, येत्या काही दिवसांत Google अपग्रेड रोल आऊट होणार आहे.