विद्या बालनचा शेरनी जगातील २४० हून अधिक देशांमध्ये १८ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विद्या बालन प्रमुख भूमिकेत आहे. ती एका वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन न्यूटन’फेम, पारितोषिक विजेता फिल्ममेकर अमित मसुरकर यांनी केलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.