भारतीय सैन्यातील(Indian army) जवान आपल्या जिवाची पर्वा न करता देशाचे संरक्षण करत असतात. कोणतेही संकट आले तरी ते लढण्यासाठी तत्पर असतात. भारतीय जनतासुद्धा वेगवेगळ्या प्रकारे सैन्यातील जवानांबद्दलचं प्रेम व्यक्त करत असते. मध्य प्रदेशातला एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल(viral video) होत आहे. या व्हिडिओमध्ये सैन्यातून रिटायर होऊन घरी परतलेले जवान नायक विजय बी सिंह यांचे त्यांच्या गावात अनोख्या पद्धतीने स्वागत (retire army man welcome in madhya paradesh) करण्यात आले. विजय मध्य प्रदेशातील जीरन गावी पोहोचताच गावकऱ्यांनी विजय यांचे पाय जमिनीवर पडू नये म्हणून जमिनीवर हात ठेऊन त्यावरून विजय यांना चालायला सांगितले.