‘खंडेराया झाली माझी दैना’, ‘दिवाना’ या गाण्यांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर ‘टपोऱ्या डोळ्यात’(Taporya Dolyat Song) हे गाणं चेतन गरुड प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. ‘चेतन गरुड प्रॉडक्शन’(Chetan Garud Production) आणि विकास दुबे(Vikas Dubey) निर्मित ‘टपोऱ्या डोळ्यात’ हे गाणे युट्युब चॅनेलवर झळकलं आहे.  या गाण्यात ‘बॉईज २’ चित्रपटातील अभिनेता प्रतिक लाड(Pratik Lad) आणि अभिनेत्री सोनाली दळवी (Sonali Dalvi)यांची लव्हेबल केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळणार आहे. हे गाणं पंकज दत्तू वारुंगसे यांनी लिहिलं असून या गाण्याला संगीतबद्ध करण्याची धुराही त्यांनीच पेलवली आहे. गायक ऋषिकेश शेलार याने हे गाणे स्वरबद्ध केलं आहे. प्रोजेक्ट हेड म्हणून चेतन रविंद्र गरुड यांनी स्वतः बाजू सांभाळली असून चेतन महाजन आणि राहुल जी यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली हे गाणं दिग्दर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याचे नयनरम्य चित्रीकरण कॅमेरामॅन रुपेश पैकराव याने आपल्या कॅमेरात कैद केलं आहे.