कोरोना संकटावर पूर्णपणे मात करण्यासाठी आजपासून देशात (India) लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) जगातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाला (Corona Vaccination Campaign) प्रारंभ केला आहे. भारतात सर्वप्रथम दिल्लीतील एम्समधील (AIIMS) सफाई कर्मचारी मनीष कुमार यांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली. त्यानंतर प्रतिक्रिया देताना मनीष कुमार (Manish Kumar) यांनी पहिल्यांदा कोरोना लस घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच या लसीबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचेही स्पष्ट केले.