वाघ जंगलातील वन्यप्राण्याची शिकार करताना एक व्हीडिओ(video of tiger hunting) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील हा व्हिडिओ आहे. सुमारे तीन दिवसांपूर्वी चोरबाहुली गेटजवळ एका पर्यटकानं वाघाची ही दृश्ये टिपली आहेत.वाघ सांबराच्या पिल्लाची शिकार करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. घाटमारा नावाच्या वाघिणीने ही शिकार केली आहे.