ओडिसा: कालाहांडीच्या करलापट वन्यजीव अभयारण्याजवळ राष्ट्रीय महामार्ग ४६ वर नुकताच एक हत्ती दिसून आला. हा हत्ती रस्त्याच्या मध्यभागी(elephant on the road) येऊन उभा राहिल्याने वाहतूक कोंडी(traffic jam by elephant) निर्माण झाली. त्यानंतर वन अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत हत्तीमुळे कोणतेही वाहन रस्ता ओलांडून पुढे जाऊ शकले नाही. थोड्या वेळाने हा हत्ती स्वत:च जंगलात निघुन गेला. मग वाहतूक सुरळीत झाली.