नेहमीच पठडीपेक्षा वेगळ्या भूमिका साकारत सर्वांचं लक्ष वेधून घेणारी तापसी पन्नू (Taapsi Pannu)पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रश्मी रॅाकेट' (Rashmi Rocket)या आगामी चित्रपटात ती एखाद्या रॅाकेटच्या गतीनं धावताना दिसणार आहे. (Rashmi Rocket Trailer Release) रश्मी रॉकेट्र या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आकर्ष खुराना यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचा बहुप्रतिक्षीत प्रीमियर झी५वर होणार आहे. कच्छमधील एका छोट्या गावातल्या तरुण मुलीची ही कथा आहे. तिच्याकडं धावण्याची एक अविश्वसनीय शक्ती आहे. हा चित्रपट नंदा पेरियासामी यांच्या मूळ कथेवर आधारित आहे. चित्रपटाच्या शीर्षकाला न्याय देत 'रश्मी रॉकेट'चा ट्रेलर नायिका आणि तिच्या रश्मी रॉकेट बनण्याच्या प्रवासाची प्रेरक कहाणी दर्शवणारा आहे. हृदयाला भिडणारे संवाद, भावना आणि तापसीचं अभिनयकौशल्य यासोबत पुरेपूर नाट्य असलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटात तापसीचं कणखर आणि संवेदनशील रूप पहायला मिळणार आहे.

Raavsaheb Teaser Release ‘गोदावरी’ नतंर दिग्दर्शक निखील महाजनचा नवा चित्रपट, रावसाहेबचा रहस्यमय टिझर प्रदर्शित!
1/5

Sky Force teaser release'या' तारखेला रिलिज होणार अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स'! भारत पाकिस्तानमधील पहिला हवाई हल्लाचं चित्रण, अगांवर काटा आणणार टिझर रिलीज
2/5

TejasTeaserचंद्रमुखी 2 पाठोपाठ कंगनाचा आणखी एक चित्रपट घालणार धुमाकुळ, 'तेजस'चा धमाकेदार टिझर रिलिज!
3/5
