उत्तराखंड (Uttarakhand) च्या जोशी मठात रविवारी सकाळी जवळपास १०.३० वाजता हिमकडा कोसळल्याने एकच हाहाकार माजला होता. रविवारी नंदादेवी येथील हिमकडा कोसळल्याने धौलगंगा नदीला पूर आला होता या पुरामुळे अनेकांचा मृत्यू झाला. या ठिकाणी अद्यापही मदतकार्य सुरूच आहे. या दुर्घटनेत एसडीआरएफने चमेली जिल्ह्यातील तपोवन धरणाजवळ मदतकार्य सुरू केले आहे.