कोल्हापूर: या वर्षी राज्यात पाऊस(Rain) समाधानकारक झाल्यामुळे बळीराजा आनंदी असून शेतीची अनेक कामे पार पडली आहेत. सध्या राज्यात भात लागवडीची कामे पूर्ण झाली आहेत. भात लागवडीनंतर पीक चांगले व्हावे यासाठी लावणी महत्त्वाची असते. त्यामुळं सध्या लावणी कामांना वेग आला आहे. कोल्हापूर(Rain In Kolhapur) जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. भात लागवडीची कामेही मोठ्या प्रमाणात पार पडली आहेत. आता भात लागवड झाल्यानंतर लावणीच्या(Rice Plantation) कामाची लगबग जोरात सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात, विंझणे या गावात पारंपारिक पद्धतीने भात लावणी केली जात आहे. यावेळी महिला पारंपरिक पद्धतीने गाणी म्हणत लावणी करताना पाहायला मिळत आहेत. ही गाणी(Songs) समाज प्रबोधन करणारी आहेत. जनाबाईंचे अभंग तसेच बहिणाबाई चौधरी यांची गाणी प्रामुख्याने गायली जात आहेत. काम करत या महिला पारंपरिक गाणी गाताना पाहयला मिळत आहे.