नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर अनेक शेतकरी नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या हिंसाचाराला पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत(rakesh tikait) यांनी केला आहे. ट्रॅक्टर रॅली यशस्वी झाल्याचं विधानही त्यांनी केलं आहे. शेतकरी संघटनेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.