आपण फेसबुकवर अनेकदा गंमत म्हणून एखादा गेम खेळायचा म्हणून तेथे नव्याने लॉग इन करतो. गेम खेळून झाल्यानंतर ते लॉग इन तसंच सुरू राहतं. फेसबुक तुमच्या या सगळ्या बारिक-सारिक गोष्टींवर पक्कं लक्ष ठेऊन असतं. एवढंच काय तर आपण कोणकोणती apps वापरतो याचंही फेसबुक निरीक्षण करत असतं. तुमची प्रत्येक अॅक्टिविटी फेसबुक पहात असतं. नाही म्हटलं तर ही एक प्रकारची नजरकैदच असते म्हणा. या नजरकैदेतून आता तुमची कायमची मुक्तता होऊ शकते. तुम्ही ठरवलं तर तुम्हालाच हा अधिकार आहे. त्यासाठी पाहा हा व्हिडिओ