इंफाळ : मणिपूर(manipur) आणि आसाम(aasam) या पुर्वोत्तर राज्यांमध्ये दरवर्षी वर्ल्ड वेटलँड्स डे(world wetlands day) साजरा केला जातो. यावर्षी मणिपूरमध्ये वर्ल्ड वेटलँड्स डेच्या निमित्ताने पुम्लेनपाट तलावाचा(lake) संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. पुम्लेनपाट तलाव हा लोकतक तलावानंतर मणिपूरमधील दुसरा मोठा तलाव आहे.पुम्लेनपाटच्या शेतकऱ्यांनी तलावाच्या दुरावस्थेबाबतचे अनुभव सांगितले. या कार्यक्रमासाठी पर्यावरण विषयातले तज्ञ आणि पर्यावरण रक्षणाचे काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.