१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे हिरो सॅम मानेकशॉ; जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही विशेष गोष्टी

सॅम मानेकशॉ हेच ते सेना अधिकारी आहेत ज्यांच्या नेतृत्वात १९७१ मध्ये भारत पाकिस्तान युद्ध भारताने जिंकले होते. जानेवारी १९७३ मध्ये सॅम मानेकशॉ पहिले असे जनरल बनले ज्यांना फिल्ड मार्शल ही रँक देण्यात आली. 

  • Sam Manekshaw, vijay diwas 2020

१९७१ च्या भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात पाकिस्तानने भारतासमोर लोटांगण घातले होते. भारताने पाकिस्तानच्या ९३००० सैनिकांना आत्मसमर्पण करण्यासाठी मजबूर केले होते. भारतीय सैन्याच्या एका हीरॊमुळे हे शक्य झाले. त्यांचे नाव आहे फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ ( Sam Manekshaw).

१६ डिसेंबर १९७१ रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता मानेकशॉ यांनी जनरल जैकब यांना एक संदेश पाठविण्यात आला की, त्यांना आत्मसमर्पणाच्या तयारीसाठी तात्काळ ढाका येथे पोहोचायचे आहे. माजी पाकिस्तानी सेना प्रमुख जनरल नियाजी यांनी जैकब यांना घेण्यासाठी एक कार ढाका विमानतळावर पाठविली.

जैकब कारपासून काही अंतरावर असतानाच त्यांच्यावर मुक्ती वाहिनीच्या लोकांनी गोळीबार सुरु केला. तात्काळ जैकब यांना परिचय द्यावा लागला की, ते भारतीय सैन्याचे अधिकारी आहेत. यानंतर जैकब यांनी नियाजी यांना आत्मसमर्पणच्या अटी वाचून दाखविल्या. भारताने पाकिस्तानच्या ९३००० सैनिकांना आत्मसर्पण करण्यास भाग पडले.

अत्यंत प्रभावी आणि कडक शिस्तीच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना नाही म्हणण्याची कोणाचीच हिम्मत होत नसे, परंतु १९७१ च्या युद्धाची भूमीला इंदिरा यांनी जेव्हा मंडली तेव्हा मानेकशॉ यांनी हे युद्ध न करण्याचा सल्ला त्यांना दिला. यामागचे कारण म्हणजे इतक्या कमी कालावधीत युद्धस्थळावर भारतीय सैनिक एकत्र करणे शक्य नव्हते तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढण्यासाठी सैन्याला प्रशिक्षणही देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी हे युद्ध न करण्याचा सल्ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दिला होता.

सॅम मानेकशॉ प्रत्येक सैनिकांच्या सुखदुःखात सामील व्हायचे. मोर्चा असो व इतर काही ते सैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असायचे. निवृत्तीनंतर त्यांनी निलगिरीच्या पर्वतांमध्ये आपले घर बनविले होते. त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत ते तेथेच वास्तव्यास होते.

३ एप्रिल १९१४ ला पंजाबच्या अमृतसर येथे जन्मलेल्या सॅम यांनी तब्बल ४० वर्ष सैन्यात सेवा केली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पाच युद्ध लढले आहे. त्यांनी करियरची सुरुवात ब्रिटिश इंडियन आर्मीपासून केली. दुसऱ्या विश्वयुद्धातही त्यांनी सहभाग घेतला होता.  सॅम होर्मूसजी फ्रेमजी जमशेद जी मानेकशॉ असे होते.

पद्मविभूषण, पद्मभूषण आणि मिलिट्री क्रॉस या पुरस्काराने सन्मानित केल्या गेलेले ते आठवे आर्मी स्टाफ चीफ होते. १९३२ साली ते भारतीय सेना अकादमी देहरादुन येथे सेवेत रुजू झाले.  सॅम मानेकशॉ यांनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश इंडियन आर्मी विरुद्ध युद्ध केले होते.

सॅम मानेकशॉ हेच ते सेना अधिकारी आहेत ज्यांच्या नेतृत्वात १९७१ मध्ये भारत पाकिस्तान युद्ध भारताने जिंकले होते. जानेवारी १९७३ मध्ये सॅम मानेकशॉ पहिले असे जनरल बनले ज्यांना फिल्ड मार्शल ही रँक देण्यात आली.