vijay diwas 2020

१९७१ च्या युद्धाअंती पाकिस्तानच्या तब्बल ९३००० सैनिकांनी भारतीय सेनेसमोर सशस्त्र शरणागती पत्करली होती. यानंतरच पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागाला आज आपण बांग्लादेश म्हणून ओळखतो. 

भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत चारवेळा युद्ध झाले आहे. १९४७-४८, १९६५, १९७१ आणि १९९९ या चारही युद्धात १९७१ चे युद्ध हे विशेष महत्वप्राप्त आहे. १६ डिसेंबर १९७१ ही तारीख भारताच्या शौर्य गाथेत सुवर्ण अक्षरात कोरली गेलेली आहे. १९७१ च्या भारत पाकिस्तानच्या युद्धात भारताने पाकिस्तानला निस्तनाभूत केले व मोठी अद्दल घडविली होती. हा दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शासनकाळात भारताने पाकिस्तानला त्या जखमा दिल्या ज्याचा विचार करून पाकिस्तानचा आजही तिळपापड होतो.

१९७१ च्या युद्धाअंती पाकिस्तानच्या तब्बल ९३००० सैनिकांनी भारतीय सेनेसमोर सशस्त्र शरणागती पत्करली होती. यानंतरच पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागाला आज आपण बांग्लादेश म्हणून ओळखतो.

पाकिस्तानचा तत्कालीन तानाशाह याहिया खान ने १९७१ च्याकाळात पूर्व पाकिस्तानच्या भागात जनभावना तुडविण्यास सुरवात केली. त्यानंतर पाकिस्तानी क्रांतिकारी नेता शेख मुजीब यांना अटक केली. या सर्व प्रकारामुळे घाबरलेले शरणार्थी भारतात येऊ लागले. पाकिस्तानी सेना तिथल्या लोकांशी अमानवीय व्यवहार करू लागली. याचा भारतावर प्रभाव पडू लागला.

शेवटी भारताने कठोर निर्णय घेत पूर्व पाकिस्तानवर हल्ला केला व या भागातून पाकिस्तानचा समूळ नायनाट केला आणि एक स्वतंत्र देश बांगलादेश जन्मला आला.