बाथरुमला जाण्याआधी महिलेने खरेदी केले लॉटरीचे तिकिट; झाली १५ कोटींची मालकीण

अलीकडेच अशाच एका महिलेचं नशीब क्षणार्धात पालटलं आहे. असं म्हणतात की, नशीबाचा हा खेळ अतिशय वेगळाच असतो आणि हे तितकंच खरही आहे. लॉटरी किंवा जॅकपॉट लागल्यानंतर लोकांचं आयुष्यच बदलून जातं. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं आहे.

    नवी दिल्ली: कधी कोणाचं नशीब पालटेल हे कोणीही सांगू शकत नाही. असं म्हणतात की, आपलं नशीब बदलण्यासाठी आपली मेहनत आणि प्रयत्न आवश्यक असतात. तर काही ठिकाणी नशीबाची सोबत मिळाल्यावर काम होऊन जाते. जगात असे अनेक लोकं आहेत ज्यांचं नशीब एका रात्रीत चमकते. त्यांनी याचा वितारही केलेला नसतो की, त्यांच्यासोबत असं काही घडलं आहे.

    अलीकडेच अशाच एका महिलेचं नशीब क्षणार्धात पालटलं आहे. असं म्हणतात की, नशीबाचा हा खेळ अतिशय वेगळाच असतो आणि हे तितकंच खरही आहे. लॉटरी किंवा जॅकपॉट लागल्यानंतर लोकांचं आयुष्यच बदलून जातं. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं आहे. ही महिला आपल्या कुटुंबियांसोबत फिरायला गेली होती. तेव्हा या महिलेने लॉटरीचं तिकिट खरेदी केलं आणि तिचं नशीबच पालटलं. या लॉटरीने तिने १५ कोटी रुपये जिंकले आहेत.

    हे प्रकरण अमेरिकेतील आहे. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार, हे प्रकरण न्यू जर्सी येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील आहे. हे कुटुंब उत्तर कॅरोलिना येथे फिरायला गेले होते तेथून आपल्या घरी परत येत होते. या प्रवासादरम्यान ब्रेक घेण्यासाठी म्हणून ते मेरीलँड येथे थांबले होते. कुटुंबातील सर्व सदस्य बाथरूम ब्रेकसाठी थांबले होते. तेव्हा कुटुंबातील एका महिलेने लॉटरी घेण्याचं पक्कं केलं आणि खरेदीही केलं.

    पहिल्यांदा परिवारातील अन्य लोकांना ही गोष्ट विचित्रच वाटली पण त्यानंतर त्यांनी लॉटरी खरेदी केली. या कुटुंबाने अधिकाऱ्यांना सांगितलं की, उत्तर कॅरोलिना येथे फिरायला गेल्यानंतर आपल्या घरी परत येत होते. जेव्हा ही महिला लॉटरी खरेदी करण्यासाठी तेथे गेली तिथे असलेल्या व्यक्तीला ती सिगारेट विकत घेण्यासाठी आली असावी असे वाटले. पण जेव्हा लॉटरी खरेदीविषयी सांगितलं तेव्हा अधिकाऱ्याने तिला तिकिट दिलं नाही.

    लॉटरीचं तिकिट दिल्यानंतर संपूर्ण कुटुंब आपल्या घरी न्यू जर्सी येथे घरी आला. यानंतर २४ जुलैला लॉटरीच्या तिकिटाचा रिझल्ट आला आणि रातोरात यांचं नशीबच पालटलं. या कुटुंबाने जे लॉटरीचं तिकिट खरेदी केलं ते २ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास १५ कोटींचा जॅकपॉट जिंकला आहे. ही बातमी कळल्यावर पहिल्यांदा सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पण त्यानंतर त्यांना ही बातमी कळल्यावर अतिशय आनंद झाला.