नवरदेवाचं असं वागणं पाहून नवरीचा झाला जळफळाट, दुसऱ्या मुलींसोबत फोटो काढणं पडलं महागात

नवरदेव-नवरीचा हा लग्नाचा व्हिडिओ इंटरनेटवर लोकं आवडीने पाहात आहेत. या लग्नात असं काही घडलं की ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, नवरी लग्नाच्या सोफ्याच्या जवळच उभी असून नवरदेव थोडा लांब उभा आहे. यानंतर जे घडतं ते अतिशय मजेशीर आहे.

  नवी दिल्ली: लग्नाचे व्हिडिओ (Merriage Videos) दररोज सोशल मीडियावर व्हायरल (viral on social media) होतात. बरेच व्हिडिओ खूप भावनिक असतात आणि बरेच विनोदी व्हिडिओ (Funny Videos) असतात. पण आज आपण ज्या व्हिडिओबद्दल बोलत आहोत तो यापेक्षा वेगळा आहे. वास्तविक, लग्नाचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्हालाही हसू येईल.

  इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय व्हिडिओ

  नवरदेव-नवरीचा हा लग्नाचा व्हिडिओ इंटरनेटवर लोकं आवडीने पाहात आहेत. या लग्नात असं काही घडलं की ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, नवरी लग्नाच्या सोफ्याच्या जवळच उभी असून नवरदेव थोडा लांब उभा आहे. यानंतर जे घडतं ते अतिशय मजेशीर आहे. तुम्ही पाहू शकता की नवरदेव असा थोडा दूर एकटाच फोटो काढण्यात मग्न आहे.

  नवरी झाली नाराज

  नवरदेवाने एकट्याने असे फोटो काढताना पाहून नवरीचं नाराज होणे साहजिकच आहे. पण प्रकरण तिथेच संपत नाही, यानंतर नवरीही रागाने लालबुंद झाली आहे. खरं तर, जेव्हा नवरदेवाचा एकटा फोटो काढला जातो, तेव्हा तिथल्या दोन मुली नवरीसमोरच त्याला फुले देऊ लागतात. हे बघून नवरी तिच्या मित्रांसोबत वेगळी उभी राहते खूप रागवते. तिला राग येतो तेव्हा तिचा राग पाहण्यासारखा असतो.

  लोकांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

  हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. युझर्स या व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये एका युझरने लिहिले आहे, “नवरीच्या मैत्रीणी नवरदेवासोबत एकत्र उभ्या राहून तिला भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सांगत आहे की तुमच्या पतीची एक्स गर्लफ्रेंड त्याला भेटायला आली आहे.” इतर प्रतिक्रियांमध्येही असेच म्हटले गेले आहे, “भावाचं आज काही खरं नाही. एका युझरने लिहिले, “आज तर याची काही खैर नाही”.