VIDEO : तिने कंबरेवर नाही तर Bumps वर फिरवला HulaHoop! अन् झाला तिच्या अजब कौशल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड

तिनं आपल्या बम्प्सवर सलग ३१ मिनिट २५ सेकंद हुला हूप फिरवत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. याचा व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. अर्थात हा विक्रम दिसतो तितका सोपा नाही.

    जगभरात आपलं नाव व्हावं किंवा जागतिक विक्रमासाठी प्रसिद्ध अशा गिनीज बुकमध्ये आपलं नाव नोंदलं जावं यासाठी लोकं काहीही करायला तयार असतात. आजपर्यंत कुणी केलं नाही अशा पद्धतीचं एखादं काम करण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी विचित्र वाटतील अशा गोष्टीही केल्या जातात. अशाच एका थोड्याशा विचित्र विक्रमाची नुकतीच गिनीज बुकमध्ये (Guinness Book of World Records) नोंद झाली आहे.

    हा विक्रम आहे हुला हूप फिरवण्याचा. यात काय विशेष असं वाटेल, पण विक्रम होण्यासारखी बाब पुढेच आहे. सहसा आपण हुला हूप डान्सर्स कंबर (Hula hoop on bumps) किंवा गळ्याभोवती हुला हूप फिरवताना आपणं पाहिलं आहे. पण एका महिलेनं तिच्या बम्प्सवर सर्वाधिक वेळ हुला हूप फिरवलं आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच विक्रम आहे.

    हुला हूप म्हणजे प्लास्टिकच्या गोलाकार नळ्या एकत्र जोडून एक गोल चक्र तयार केलं जातं, हे चक्र कंबरेत घालून कंबर फिरवत त्याला गती दिली जाते आणि ते गोलाकार फिरवलं जातं.

    बम्प्सवर सर्वाधिक वेळ हुला हूप (Hula hoop) फिरवण्याचा विक्रम करणाऱ्या महिलेचं नाव अँड्रिया एम (Andrea M) असं आहे. तिनं आपल्या बम्प्सवर सलग ३१ मिनिट २५ सेकंद हुला हूप फिरवत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. याचा व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. अर्थात हा विक्रम दिसतो तितका सोपा नाही. त्यासाठी अँड्रियानं २ वर्षे कसून मेहनत घेतली आहे. अँड्रियानं सांगितलं की, अशा पद्धतीनं हूप फिरवताना मांडीच्या स्नायूंमध्ये प्रचंड वेदना होतात. मात्र विक्रम नोंदवण्याच्या ध्येयानं झपाटल्यानं तिनं अथक मेहनत घेऊन हे कौशल्य साध्य केलं आहे.

    तिचा हा व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय झाला असून, लोकं तिच्या जिद्दीचं भरभरून कौतुक करत आहेत. एक वेगळाच विक्रम नोंदवत तिनं गिनीज बुकमध्ये एक नवीन विभाग उघडला आहे. त्यामुळे आता लोकांना या प्रकारचा नवीन विक्रम नोंदवण्याची संधी मिळणार आहे.

    तुम्हालाही अनोखे काम करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवायचं असेल तर तुमच्याकडे असलेल्या एखाद्या अनोख्या कौशल्यात नैपुण्य मिळवा आणि एखादा विक्रम नोंदवा. किंवा हा हुला हूपचा विक्रम मोडायचा असल्यास सरावाला लागा. यासाठी कोणत्याही प्रशिक्षणाचीदेखील आवश्यकता नाही. दीर्घकाळ सराव करून तुम्हीही यात नवीन विक्रम नोंदवू शकता.

    hula hooping longest duration around the bumps 31 min 25 sec by andrea guinness book of world records