man eating burger

तीन किलोचा बर्गर खाण्यासाठी मॅट नावाच्या व्यक्तीला फक्त ४ मिनिटे लागली आहेत. मॅटचा बर्गर खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर(Social Media) व्हायरल (Viral Video)झाला आहे.

    खाण्यासाठी जन्म आपुला,असे खूप जणांचे आयुष्याचे ध्येय असते.काहीजण तर खाण्याचे वेगवेगळे विक्रम करत असतात. कुणी जेवण बनवण्याचा रेकॉर्ड(Food Record) करत असतं तर कुणी खाण्याचा. अनेक ठिकाणी कमी वेळात जास्त खाण्याच्या स्पर्धासुद्धा(Competition Of Eating) आयोजित केल्या जातात. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक माणूस कमी वेळात जास्त बर्गर खाताना दिसत आहे. हा माणूस ४ मिनिटात(3 kg Burger Eaten In 4 Minutes) बेकनचे ४० स्लाइस, ८.५ पॅटी आणि पनीरचे १६ स्लाइसने तयार केेलेला २०,००० कॅलरीचा बर्गर खाताना दिसतोय.

    मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओत दिसत असलेल्या मॅट नावाच्या व्यक्तीने बर्गर खाण्यासाठी फक्त ४ मिनिटे लागली. या बर्गरचं वजन २.९७ किलो इतकं होतं. मॅटने बर्गर खात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मॅटने हा रेकॉर्ड २६ जुलैला केला होता. याआधी ज्या व्यक्तीच्या नावावर हा रेकॉर्ड आहे, त्या व्यक्तीने हा बर्गर खाण्यासाठी ७ मिनिटे घेतली होती.

    मॅटच्या यु ट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. त्याच्या कामगिरीबद्दल अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.