Shocking : नवजात अर्भकाला रुग्णालयाच्या कमोडमध्ये टाकून केलं फ्लश! असा झाला खुलासा

२० वर्षीय आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे, यानंतर ती गर्भवती राहिली होती. पोलिसांनी गुरुवारी आरोपीला केरळच्या वायनाड जिल्ह्यातून अटक केली असून त्याला कोच्चीला आणलं आहे. लवकरच त्याला येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

  कोच्ची : केरळ (Kerala)च्या कोच्ची (Kochi) जिल्ह्यात एक हृद्यद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका बलात्कार पीडितेने वेळेआधीच जन्माला आलेल्या आपल्या नवजात अर्भकाला कमोडमध्ये टाकून फ्लश केलं आहे. प्रकरण उघडकीस येताच एकच खळबळ उडाली आहे. तरुणीने खासगी रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये नवजात अर्भकाला जन्म दिला होता. त्यानंतर तिने ते अर्भक फ्लश (Rape Victim Flushes Premature Baby) केलं आहे.

  बलात्कारानंतर राहिली होती गर्भवती

  २० वर्षीय आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे, यानंतर ती गर्भवती राहिली होती. पोलिसांनी गुरुवारी आरोपीला केरळच्या वायनाड जिल्ह्यातून अटक केली असून त्याला कोच्चीला आणलं आहे. लवकरच त्याला येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

  त्या दिवशी काय घडलं होतं?

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा खुलासा गेल्या बुधवारी तेव्हा झाला जेव्हा अल्पवयीन मुलगी आपल्या आईसोबत तपासणीसाठी खासगी रुग्णालयात गेली होती. रुग्णालयात जेव्हा ही मुलगी टॉयलेटला गेली तेव्हा तिने बाळाला जन्म दिला. यानंतर तिने ही बाब डॉक्टर आणि रुग्णालयाला सांगण्याऐवजी ते बाळ कमोडमध्ये फ्लश केलं.

  असा झाला खुलासा

  तरुणी आल्यानंतर जेव्हा दुसरी महिला टॉयलेटला गेली तेव्हा तिला ते अर्भक टॉयलेटमध्ये असल्याचं आढळून आलं. डॉक्टर्सना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस पथकाने केलेल्या तपासात तरुणीनेच नवजात अर्भक टॉयलेटमध्ये फ्लश केल्याचं निष्पन्न झालं.

  पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, तरुणीची विचारपूस केल्यानंतर तिचे आरोपीशी संबंध असल्याचे कबूल केलं. अल्पवयीन मुलीने आपले संबंध आणि गर्भवती राहण्याबाबत कोणालाही माहिती दिली नव्हती असंही ते पुढे म्हणाले. ती गेल्या ६ महिन्यांपासून गर्भवती होती. तथापि, पीडितेच्या आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.