मुलींना Rape करण्याआधी देत होता तीन ऑप्शन, त्यानंतर पार करत होता क्रूरतेच्या सर्व सीमा

इंग्लंडचा मिडिल्सब्राचा रहिवासी असलेला डॅनियल यूल (Daniel Yule) याला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तो महिलांना वासनेचा बळी करण्याआधी त्यांचा विविध प्रकारे छळ करत असे. हा गुन्हेगार महिलांसमोर तीन ऑप्शन ठेवायचा आणि म्हणायचा तुमच्या इच्छेनुसार अंगठी, हातोडी किंवा चाकू यापैकी एकाची निवड करण्यास सांगत असे.

  लंडन : ब्रिटनच्या एका न्यायालयाने (British Court) ने अनेक महिलांवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी एका व्यक्तीला १४ वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली आहे. गुन्हेगार महिलांवर बलात्कार करण्यापूर्वी तीन ऑप्शन देत असे, पण त्याला हवं तेच तो करत असे. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान पीडित मुलींनी जेव्हा त्यांच्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला तेव्हा उपस्थित सर्वच हैराण झाले

  तो हे तीन पर्याय देत असे

  डेली स्टारच्या वृत्तानुसार, इंग्लंडचा मिडिल्सब्राचा रहिवासी असलेला डॅनियल यूल (Daniel Yule) याला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तो महिलांना वासनेचा बळी करण्याआधी त्यांचा विविध प्रकारे छळ करत असे. हा गुन्हेगार महिलांसमोर तीन ऑप्शन ठेवायचा आणि म्हणायचा तुमच्या इच्छेनुसार अंगठी, हातोडी किंवा चाकू यापैकी एकाची निवड करण्यास सांगत असे.

  मजा येईल असे सांगून करत होता बलात्कार

  पोलिसांनी न्यायालयाला माहिती दिली की, डॅनियल यूल महिलांना म्हणत असे की, एकतर अंगठीचा पर्याय निवडून मला संभोग करू द्या नाहीतर हातोडी किंवा चाकूने मरण्यास तयार व्हा. भलेही महिला दुसरा किंवा तिसरा पर्याय निवडत होत्या, तराही तो त्यांच्यावर बलात्कार करतच होता. जबाबात एका पीडितेने सांगितले की, तिने मृत्यूचा पर्याय निवडला होता, पण यूलने असं सांगत तिच्यावर बलात्कार केला की, त्याला यात मजा आली.

  त्याला नव्हती अटकेची भीती

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या घटनेत गुन्हेगार डॅनियल यूलने प्रथम पीडितेला तिच्या चेहऱ्यावर मुक्का मारून आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या पीडितेने न्यायालयाला सांगितले की, ‘यूलने बलात्कारापूर्वी धमकी दिली होती की, जर मी विरोध केला तर त्याचे परिणाम भयंकर होतील.’ आपले तोंड बंद ठेवा आणि मी शांतपणे जे करत आहे ते मला करू द्या.