पतीसोबत म्हशींना आंघोळ घालताना दिसली सपना चौधरी; त्यानंतर अशा काही घडल्या गोष्टी की, लोकांना हसू झालं अनावर- पहा व्हायरल व्हिडिओ

वास्तविक, सपनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या म्हशींना आंघोळ (baths to buffaloes) घालतानाचा एक व्हिडिओ पोस्ट (Video Post) केला आहे. हा मजेशीर व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि एवढेच नाही तर नेटिझन्सनाही हा व्हिडिओ खूप आवडला आहे

  नवी दिल्ली: बिग बॉसमध्ये (Bigg BosS ) झळकलेली हरियाणवी डान्सर सपना चौधरीला (Sapna Choudhary) कोण ओळखत नाही. ती तिच्या अनोख्या नृत्यासाठी (Dance) ओळखली जाते आणि तिचे करोडो चाहते (fans) देखील आहेत. सपना चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय (Active On Social Media) आहे. तिने नुकताच तिच्या इंस्टाग्राम (Indtagram) अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे जो मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे.

  व्हिडिओ भलताच चर्चेत

  वास्तविक, सपनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या म्हशींना आंघोळ (baths to buffaloes) घालतानाचा एक व्हिडिओ पोस्ट (Video Post) केला आहे. हा मजेशीर व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि एवढेच नाही तर नेटिझन्सनाही हा व्हिडिओ खूप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनेक म्हशी एका तलावात सहजपणे आंघोळ करत आहेत आणि त्याच्या काठावर सपना बसली आहे. हा व्हिडिओ सुमारे ५ मिनिटांचा आहे, ज्यात सपना म्हशीला तिच्याकडे बोलावते पण म्हैस सपनाकडे दुर्लक्ष करते आणि तिच्या जवळ जात नाही.

  सपना चौधरी नाराज

  म्हैस तिला बिल्कुलच भाव देत नाही, बोलविल्यावर येत नाही म्हणून सपना नाराज होते, आणि म्हणते, ” मी ही तुझी कुणीतरी लागते, वीराच तुझा वीर आहे का? सपना असं म्हटल्यानंतरही म्हैस जागची हालत नाही. व्हिडिओत हे दृश्य पाहणं अतिशय मजेशीर वाटत आहे.

  ‘दोन पायांपेक्षा चार पाय असलेले चांगले’

  यानंतर सपनाचा पती वीर साहू व्हिडिओमध्ये दिसत आहे. सपनाचा नवरा म्हशीला बोलवतो तेव्हा ती लगेच त्याच्याकडे जाते. यावर सपना चौधरीने तिच्या पतीला विचारले की, त्यांना काय वाटतं? प्रतिसादात वीर म्हणतो, खूप छान. मग सपना दुसरा प्रश्न विचारते. तुमचं म्हशीवर एवढं प्रेम का? यावर उत्तर मिळाते, “ती मला प्रेयसीसारखी आहे, दोन पाय असलेल्यांपेक्षा चार पाय असलेले कधीही चांगलेच.”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

  युझर्सनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

  या मजेशीरव्हायरल व्हिडिओवर युझर्सनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युझर म्हणतो, ” पाण्यातून म्हैस बाहेर येणं म्हणजे एखाद्या महिलेने ब्युटी पार्लरच्या बाहेर येण्यासारखं आहे. दुसरा युझर म्हणतो, तुम्ही माझ्या सर्वात आवडत्या आहात. ‘मुर्रा म्हैस पाळली आहेस’ अशीही एकाने प्रतिक्रिया दिली आहे.