अरे बापरे ! एका कारमध्ये एवढा मुलींचा भरणा की, झाला विश्वविक्रम, पहा मनोरंजक चित्रे आणि व्हिडिओ

वास्तविक काही चिअरलीडर्सने एकत्रच कारमध्ये प्रवेश करत हा विश्वविक्रम केलाय. ही गोष्ट ऐकून तुम्हीही हैराण व्हाल की, कारमध्ये ४-५ नाही तर तब्बल २० चिअर लीडर्सनी कारमध्ये प्रवेश केला होता. आता तुम्हीही हैराण झाला असाल की, एका कारमध्ये एवढ्या साऱ्या मुली एकत्रच कशा काय कारमध्ये प्रवेश करू शकतील.

    नवी दिल्ली : साधारणपणे आपल्याला ठाऊक आहे की, कारमध्ये ४ ते ५ लोक बसू शकतात. पण त्याच कारमध्ये ६ ते ८ लोक बसले की, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण एका ठिकाणी एवढ्या मुली कारमध्ये बसल्या की, तुम्ही ऐकूनच हैराण व्हाल. असामान्य गोष्टींचाच रेकॉर्ड (Guinness Book of World Record) होतो आणि ज्याविषयी आम्ही आपणाला सांगत आहोत तो खूपच सामान्य आणि धक्कादायक आहे. जाणून घेऊया की कोणत्या गोष्टीचा झालाय विश्वविक्रम.

    वास्तविक काही चिअरलीडर्सने एकत्रच कारमध्ये प्रवेश करत हा विश्वविक्रम केलाय. ही गोष्ट ऐकून तुम्हीही हैराण व्हाल की, कारमध्ये ४-५ नाही तर तब्बल २० चिअर लीडर्सनी कारमध्ये प्रवेश केला होता. आता तुम्हीही हैराण झाला असाल की, एका कारमध्ये एवढ्या साऱ्या मुली एकत्रच कशा काय कारमध्ये प्रवेश करू शकतील. पण हे खरं आहे. स्वत:ला त्यांनी अशाप्रकारे सावरलं होतं की त्या सर्वच या कारच्या आत सामावल्या होत्या.

     

    ही काही मोठी एसयुव्ही कार नव्हती, तर एक छोटीशी स्मार्ट कार होती. ज्यात अवघे चार लोकंच बसू शकतील. कशाप्रकारे या सर्व चिअरलीडर्स कारमध्ये बसल्या, त्याचा व्हिडिओही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness Book of World Record) ने तयार केला आहे. या व्हिडिओत पाहू शकता की, कशाप्रकारे हा विश्वविक्रम केला आहे.

    पाहा व्हिडिओ :

    हा अनोखा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा विश्वविक्रम अमेरिकेच्या Glendale Cheerleaders Team ने केला होता. या व्हिडिओत पाहू शकता की, चिअरलीडर्स कारच्या डिक्की पासून ते डॅशबोर्डपर्यंत सर्व ठिकाणी सामावल्या होत्या. यानंतर हा आकर्षक आणि अनोखा विक्रम झाला आहे.