Terrible! अंगाला फटाके बांधून स्टंटबाजी, पण मध्येच झालं असं की… माणसासोबत नेमकं काय घडलं वाचा, सविस्तर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस स्टंटबाजी करताना दिसत आहे. त्याने त्याच्या संपूर्ण अंगावर फटाके लावले आहेत. फटाक्यांची माळ संपूर्ण अंगावर लावून हा माणूस फटाके फोडत आहे. त्याने अंगावर लावलेले फटाके आगपेटीच्या मदतीने पेटवले आहेत.

  मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी (Publicity) मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या करामती करतात. काही लोक आश्चर्यकारक असे स्टंट (Stunts) करतात. तर काही लोक हास्यास्पद करामती करून चर्चेत येण्यासाठी धडपडतात. सध्या एका माणसाने अतिशय अजब काम केल्याची घटना घडली आहे. या माणसाने आपल्या अंगावर फटाके लावून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला आहे (He has tried to do stunts by putting firecrackers on his body). मात्र ही स्टंटबाजी त्याच्या चांगलीच अंगलट आलेली पाहायला मिळत आहे.

  माणसाने अंगाला बांधले फटाके

  व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस स्टंटबाजी करताना दिसत आहे. त्याने त्याच्या संपूर्ण अंगावर फटाके लावले आहेत. फटाक्यांची माळ संपूर्ण अंगावर लावून हा माणूस फटाके फोडत आहे. त्याने अंगावर लावलेले फटाके आगपेटीच्या मदतीने पेटवले आहेत. यानंतर मात्र सगळं काही बदललं आहे. स्टंट करण्याच्या नादात आपण मोठी चूक केल्याचे या माणसाच्या लक्षात आले आहे.

  फटाके फुटल्यानंतर माणसाची उडाली गाळण

  आग लावल्यानंतर फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. माणसाने अंगावर लावलेले फटाके फुटत असल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतंय. मोठा आवाज करत हे फटाके फुटत असल्यामुळे माणसाची धांदल उडाली आहे. काय करावे हे त्याला समजत नाहीये. तसेच फटाक्यांमुळे निर्माण झालेल्या आगीमुळे त्याचे अंग भाजत आहे. त्याच्या संपूर्ण अंगाची आग होत आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी व्हिडिओतील माणूस सैरावैरा पळत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे जीव वाचवण्यासाठी धडपडत असताना तो थेट खाली पडला आहे. माणूस खाली पडला असला तरी फटाके वाजत आहेत. फटाक्यांमुळे सगळीकडे धूर झाल्याचे दिसतंय.

  सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

  व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र तो सोशल मीडियाच्या वेगवेगवळ्या माध्यमांवर शेअर केला जात आहे. लोक हा व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ पाहून काही लोकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. तर काही लोकांनी माणसाचा हा वेडेपणा असून त्याने असे करायला नको होते, असे मत मांडले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला ट्विटरवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.