एक अपघात जो झालाच नाही! भरधाव येणारा ट्रक कारला धडक देणार होता, पण या दरम्यान चालकाने आपले डोकं चालवलं आणि…

वास्तविक कार पिवळ्या रेषेजवळ थांबली होती. त्याच्या पलीकडे असलेली रेषा हायस्पीड लाईन आहे.

  जीव वाचला हेच बेहत्तर

  अनेकदा असं होतं की, एखादी मोठी दुर्घटना होणार असते आणि त्यानंतर अचानक ती होणारी दुर्घटना टळते. पाहून असं वाटतं की, आजच या जगाचा निरोप घ्यावा पण ते म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती. अनेकदा तर असं वाटू लागतं की, श्वास सुरू आहे की, बंद पडलाय. असंच काहीसं एका कारवाल्यासोबत झालं आहे. ही व्यक्ती हायवेवर कार ड्राइव्ह करत होती. जवळून एवढ्या वेगाने ट्रक गेला की, पाहणाऱ्यांची बोबडीच वळली.

  रस्त्यावर उभी होती कार

  वास्तविक कार पिवळ्या रेषेजवळ थांबली होती. त्याच्या पलीकडे असलेली रेषा हायस्पीड लाईन आहे.

  अगदीच जवळून गेला ट्रक

  ट्रक दुसऱ्या लेनमधून गेला. तो कारच्या इतक्या जवळून गेला की, जर कार तिथून हलली नसती तर मोठा अपघात होऊ शकला असता.

  पाहा व्हिडिओ

  हा व्हिडिओ पाहूनच लक्षात येतं की, येनकेन प्रकारेण ट्रक ड्रायव्हर आणि कार ड्रायव्हर दोघांच्याही समजुतीमुळेच मोठी दुर्घटना टळली. नाहीतर काहीही भयंकर घडू शकलं असतं. समजून घेण्याची बाब अशी की, रस्त्यावर गाडी किंवा बाइक चालविताना प्रत्येकाची जबाबदारी आहे की, सावधपणे मार्गक्रमण करायला हवं. नाहीतर हे एखाद्याच्या नुकसानीचं कारण ठरू शकलं असतं.