रतन टाटांनी केलं ट्विट-वेलकम बॅक Air India, लोक म्हणाले-टाटा है तो मुमकिन है!

या पोस्टला २३,००० हून अधिक रिट्विट प्राप्त झाले आहेत. तसेच हजारो लोक या ऐतिहासिक प्रसंगी रतन टाटा यांचे अभिनंदन करत आहेत!

  टाटा ग्रुपची झाली एअर इंडिया एअरलाईन

  देशातील सरकारी विमान कंपनी Air India आता टाटा समूहाच्या मालकीची झाली आहे. होय, १८००० कोटींची बोली लावून एअर इंडियाला आपलंस केल्यानंतर रतन टाटा यांनी Twitter वर लिहिले, ‘वेलकम बॅक एअर इंडिया’. या पोस्टला २३,००० हून अधिक रिट्विट प्राप्त झाले आहेत. तसेच हजारो लोक या ऐतिहासिक प्रसंगी रतन टाटा यांचे अभिनंदन करत आहेत!

  टाटा है तो मुमकिन है…

  ही देखील एक राष्ट्रसेवाच आहे

  एअर इंडिया पुन्हा एकदा अव्वल स्थानी असेल

  जेआरडी टाटांना खूप आनंद झाला असता…

  रतन टाटांनी या पत्रात लिहिलंय, ‘टाटा ग्रुपने एअर इंडियाची बोली जिंकणं ही अतिशय आनंदाची बातमी आहे. आम्ही जाणून आहोत की, एअर इंडियाच्या पुर्नउभारणीसाठी अतिशय मेहनत घ्यावी लागणार आहे. सोबतच, त्यांनी भविष्यात मार्केटमध्ये ती आपलं स्थान पुन्हा निर्माण करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणतात, जर भावनिकदृष्ट्या सांगायचं तर एकेकाळी JRD TATA च्या नेतृत्वात एअर इंडियाने विश्वातील सर्वच एअरलाईन्समध्ये मानाचे स्थान पटकावले होते. आता टाटांकडे तोच मान पुन्हा मिळविण्याची नामी संधीच चालून आली आहे. जर जेआरडी टाटा हयात असते तर त्यांना अतिशय आनंद झाला असता.’

  तुम्हीच खरे रिअल लाईफ हिरो आहात

  विरासत हीच आपली ओळख आहे

  द एअर इंडिया रिटर्न्स…

  मनापासून अभिनंदन सर!

  भारतात सिविल एविएशन (नागरी उड्डाण) ची सुरुवात टाटा ग्रुपचे संस्थापक जेआरडी टाटा यांनीच केली होती. त्यांनीच एअर इंडियाची स्थापना केली होती. यानंतर ती नेहरु सरकारच्या ताब्यात गेली होती. आता ६८ वर्षांनंतर पुन्हा एकदा एअर इंडिया टाटा ग्रुपच्या हाती सुपुर्द करण्यात आली आहे.