Viral Video : एंट्रीला आवडीचं गाणं लावलं नाही म्हणून वधूने हॉलमध्ये एंट्री घेतलीच नाही

तिच्या एंट्रीच्या वेळी नेमकं तिने जे गाणं सांगितलं होतं त्याच्यापुढचं गाणं डिजेवाल्याने लावलं. या व्हिडिओत ती हेच सांगत आहे. की, मी जे गाणं लावायला सांगितलं होतं ते गाणं डिजेवाल्याने लावलंच नाही. तिला याबाबत तिच्या बहिणीने आणि भावाने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला खरा पण या दोघांचेही प्रयत्न फोल ठरले आहेत.

    सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. त्यातील काही खूपच मजेशीर असतात. तर काही डोळ्यांच्या कडा पाणावणारेही असतात. काही तर असे विचित्र असतात की, समोर घडणाऱ्या घटना पाहून वऱ्हाड्यांना वेळप्रसंगी हसूही आवरणं कठीण होऊन बसतं. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

    पाहा व्हिडिओ :

    या व्हिडिओत वधूने हॉलमध्ये एंट्री करतेवेळी आवडीचं गाणं लावायला डिजेवाल्याला सांगितलं होतं पण, तिच्या एंट्रीच्या वेळी नेमकं तिने जे गाणं सांगितलं होतं त्याच्यापुढचं गाणं डिजेवाल्याने लावलं. या व्हिडिओत ती हेच सांगत आहे. की, मी जे गाणं लावायला सांगितलं होतं ते गाणं डिजेवाल्याने लावलंच नाही. तिला याबाबत तिच्या बहिणीने आणि भावाने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला खरा पण या दोघांचेही प्रयत्न फोल ठरले आहेत.

    गाणं लावलं नाही म्हणून तिने रडायलाच सुरूवात केल्याचं व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ instantfilmybytes या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ ४९३ जणांनी लाईक केला आहे.