जगातील सर्वात कंजूष आई-बाबा, पैसे वाचविण्यासाठी मुलांकडून करून घेतात असं काम…

या जगात काही अजब-गजब आई-बाबा आहेत. त्यांच्या सवयी, त्यांची वागण्याची पद्धत आश्चर्यचकित करणारे किंवा हैराण करणारे असतात. असेच एक आई-बाबा (Parents) आहेत, जे पैसे वाचविण्यासाठी स्वत: अजब काम करतात आणि आपल्या मुलांनाही करायला सांगतात. हे पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

  नवी दिल्ली : पैसे वाचविणे हा मानवी स्वभाव आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येकाला वाटतं की, त्यांच्याजवळ काही पैसे शिल्लक रहायला हवेत, म्हणून तो आपल्या खर्च कमी करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. पैसे वाचविण्यासाठी वेळप्रसंगाी तो थोडा कंजूषपणाही करतो. पण आज आम्ही अशा आई-बाबांबद्दल सांगणार आहोत त्यांच्या कंजूषपणाची गोष्ट ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. जाणून घ्या सविस्तर

  जगातील अजब-गजब आई-बाबा

  या जगात काही अजब-गजब आई-बाबा आहेत. त्यांच्या सवयी, त्यांची वागण्याची पद्धत आश्चर्यचकित करणारे किंवा हैराण करणारे असतात. असेच एक आई-बाबा (Parents) आहेत, जे पैसे वाचविण्यासाठी स्वत: अजब काम करतात आणि आपल्या मुलांनाही करायला सांगतात. हे पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. ४ मुलांचे आई-बाबा राउल आणि पेट्रीसिया पिंटो स्वत:ला सर्वात कंजूष आई-बाबा (Miser Parents) म्हणतात.

  मुलांकडून करून घेतात हे काम

  या कपल्सने कंजूषपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हे कपल आपल्या मुलांना अनेकदा गॅरेजला घेऊन जातात. तेथे मुलांकडून कार वॉश करून घेतल्यानंतर त्यांना वॅक्युम क्लीनरच्या कचऱ्याच्या बॅगमध्ये चिल्लर पैसे, कँडी शोधायला सांगतात म्हणून ते मुलांना गॅरेजमध्ये सांगतात की, पेट्रिसियाचे कानातले हरवले आहेत.

  आई म्हणते…

  त्यानंतर मुले वॅक्युम क्लीनर कचऱ्याची बॅग (Garbage Bag) चाळतात त्यातून कामाच्या गोष्टी काढून घेतात आणि एखादे नकली कानातले दाखवून गॅरेजमध्ये सांगतात की, त्यांना कानातले सापडले. पेट्रिसिया म्हणते की, माझ्या मुलांनी असं करणं म्हणजे ट्रेझर हंट सारखं आहे. ते कचऱ्यातून शिक्के, कँडी, ईयरफोन आणि एवढंच नाही तर ज्वेलरी सारख्या मौल्यवान वस्तूही शोधून देतात.

  रेस्टॉरंटमधून आणतात खाद्यपदार्थ

  कंजूषपणा करणं ही अतिशय सर्वसामान्य गोष्ट आहे. कंजूषपणा एवढा करतात की, ते जेवणही रेस्टॉरंटमधून आणतात. जेव्हा हे फ्रमिली लंच किंवा डिनरसाठी बाहेर जातात. तेव्हाही हे कंजूषपणा करण्यात तसूभरही मागे हटत नाही.

  याबाबत मुलांचे बाबा राउल म्हणतात की, ” हे ठाऊकच आहे की, आमच्या परिवारातील ६ सदस्यांसाठी खूपसाऱ्या भोजनाची गरज असते. अशातच पैसे वाचविण्यासाठी आम्ही नेहमी नळाचच पाणी पितो आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे वाचवतो. उन्हाळ्यात २ मोठी मुलं घरी आली असल्याने घराचे बजेट वाढू नये म्हणून आम्ही रेस्टॉरंटमध्ये जास्तीचे सॉस, मीठ वगैरे मागतो आणि मग ते घरी आणतो. आम्ही प्रत्येकासाठी एक वेगळं सँडविच घेण्याऐवजी एक क्लब सँडविच घेतो. असं केल्याने आम्हाला २ प्लेट कमी ऑर्डर कराव्या लागतात. त्यानंतर खूप सारं एसस्ट्रा सॅलड मागून घेतो.”

  पैसे वाचविण्यासाठीचा हा एक प्रकारे केलेला जुगाड आहे. हे ऐकून जाणकार हैराण झाले आहेत. द सनच्या एका रिपोर्टनुसार त्यांची मोठी मुलगी मोनिका म्हणते, ‘ जेव्हा आम्ही असं करतो तेव्हा वेट्रेस आम्हाला वेडे समजते आणि अतिशय वाईट नजरेने आमच्याकडे रोखून पाहते’.

  फक्त एकदाच उघडतो फ्रिज

  हे ऐकून तुम्ही हैराण व्हालच पण सोबतच तुम्हाला हसूही आवरणार नाही. मुलांनी अधिक बियर पिऊ नये म्हणून राउलने त्यांच्या फ्रिजमध्ये टायमर (Fridge timer) लावून ठेवला आहे. प्रत्येक सदस्य फक्त दिवसातून एकदा फ्रिज उघडू शकतो आणि तोही फक्त अवघ्या २४ सेकंदासाठी. एवढंच नाही ते महागड्या बियरच्या बाटल्यांमध्ये स्वस्तातली बियर भरून ठेवतात. त्यांची मुले म्हणतात आम्हाला आमच्या पालकांची सगळी चलाखी माहिती आहे आणि स्वस्तातली बियर ओळखतो.