१० वर्ष एकटी राहणाऱ्या व्हेल माशाने दिल्या भिंतीला धडका, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचं मन पाकुळलं

कार्यकर्ते फिल डेमर्स (Activists Phil Demers) या उद्यानात (working in this park) काम करतात. त्यांनी तिचा एक व्हिडिओ शेअर (share her video) केला आहे. यामध्ये ही व्हेल मादी पाण्याच्या टाकीच्या भिंतींना धडका देत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून लोकांना तिचा एकटेपणा (Loneliness) जाणवत आहे.

  जगात सर्वात एकटी राहणारी मादी व्हेल

  एक म्हणजे स्वतःच्या मर्जीने एकटे राहणे आणि दुसरे म्हणजे परिस्थिती तुम्हाला एकाकी बनवते. दोन्हीच्या पातळीवर गोष्टी बदलतात. पण आयुष्यात अनेक वेळा एकटेपणा माणसाला खाऊ लागतो. केवळ मानवच नाही तर प्राणी देखील यामुळे त्रस्त झालेले दिसून येतात. आजकाल व्हेल मादी माशाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. वास्तविक, ती एकटी राहत आहे, ती २०११ पासून कॅनडाच्या मरिनलँड मनोरंजन पार्कमध्ये टाकीमध्ये एकटीच बंद आहे.

  या टाकीत ती एकटीच राहते

  कार्यकर्ते फिल डेमर्स या उद्यानात काम करतात. त्यांनी तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ही व्हेल मादी पाण्याच्या टाकीच्या भिंतींना धडका देत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून लोकांना तिचा एकटेपणा जाणवत आहे.

  तिला बाहेर काढण्यासाठी चालवत आहेत मोहीम

  लोक या Captive Orca जातीच्या व्हेल मादीला येथून काढण्याची मोहीमही चालवत आहेत. ट्विटनुसार, हा व्हिडिओ ४ सप्टेंबर २०२१ चा आहे. किस्का असे या व्हेलचे नाव आहे. #FreeKiska वर लोक आपले मत शेअर करत आहेत आणि व्हेलच्या अधिकारांबद्दल बोलत आहेत.

  अनेक वर्षांपासून एकटीच राहतेय

  फिल म्हणतो की, ही व्हेल मादी २०११ पासून या टाकीमध्ये एकटी राहत आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, ती एकटी असल्यामुळे तणावाखाली आली आहे. द कॅनेडियन प्रेसच्या म्हणण्यानुसार, ॲनिमल वेल्फेअर सर्व्हिसने केलेल्या तपासणीत पार्कमधील बहुतेक प्राणी आजारी असल्याचे आढळून आले. या व्हेलचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचं मनही पाकुळलं असून तेही खूप भावूक झाले.