इटलीच्या सहलीसाठी 15 दिवसांची सुट्टी मंजूर; हसन मुश्रीफ यांनी मानले जनतेचे आभार, पोस्ट व्हायरल

सन मुश्रीफ यांची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

    मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेत हसन मुश्रीफ हे नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचे कारण ठरत असतात. आता पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुश्रीफ परदेश दौऱ्यावर जात आहे. त्यांच्या कागलमधील घराबाहेरच्या फलकावर याबाबतचे जाहीर निवेदन केले आहे. त्यांचा हा फलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    मुश्रीफ आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत की, परदेश दौऱ्यासाठीच्या या पंधरवड्याच्या रजा मंजुरीबद्दल जनतेचे कृतज्ञतापूर्वक आभार. इटली व स्पेनच्या सहलीवर पंधरवड्यासाठी जात असलेल्या गेल्या पंधरवड्यापासून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेकडून पंधरवड्याची रजा मंजूर करून घेतली आहे. शुक्रवारपासून दि. १० ते २४ वैद्यकीय सेवा सुरूच राहील…….!

    10 ते २४ मे या कालावधीमध्ये माझा मोबाईल सुरूच असेल. तिथली वेळ ही भारतीय वेळेच्या साडेतीन तास पुढे आहे. अत्यंत आवश्यक काम असेल तर फोन कराच. या काळात वैद्यकीय सेवा ही निरंतरपणे सुरूच असेल. त्यासाठी सकाळी कागलमधील निवासस्थान आणि मुंबईतील मंत्रालयासमोरील अ५ या निवासस्थानी रुग्णसेवेसाठी माणसांची व्यवस्था केलेली आहे.चार जून रोजीच्या मतमोजणीसाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा…! पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यावेळी पंतप्रधान निश्चित होतील, याची खात्री व्यक्त केलेली आहे. असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.