मच्छिमाराने पकडली जगातील सर्वात मोठी Goldfish; तब्बल 67 पौंड वजन

    यूके येथील एका ४२ वर्षीय मच्छिमाराने एक भलामोठा मासा पकडली आहे. मच्छिमाराने पकडलेला मासा जागतिक विक्रम मोडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मच्छिमार अँगलर अँडी हॅकेटला सुमारे ६७ पौंड वजनाचा केशरी रंगाचा गोल्डफिश सापडला आहे. या माशाच्या केशरी रंगामुळे त्याला “The Carrot” असे टोपणनाव देण्यात आले आहे. फ्रान्समधील शॅम्पेन येथील ब्लूवॉटर लेक्समध्ये त्यांना हा मासा सापडला आहे.