500 crores to Marilyn Monroe painting

सिनेसृष्टीला पडलेले एक सुंदर, पण शोकात्म स्वप्न म्हणजे मर्लिन मुन्रो. तिचे आरसपानी सौंदर्य, मनमोहक हास्य, खट्याळ अदा यांची जादू आजही कायम आहे. तिच्या छायाचित्रांना, पेंटिंगना आजही मोठीच मागणी असते. आताही तिच्या एका पेंटिंगला 195 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1500 कोटी रुपयांहूनही अधिक किंमत मिळाली आहे(500 crores to Marilyn Monroe painting).

    न्यूयॉर्क : सिनेसृष्टीला पडलेले एक सुंदर, पण शोकात्म स्वप्न म्हणजे मर्लिन मुन्रो. तिचे आरसपानी सौंदर्य, मनमोहक हास्य, खट्याळ अदा यांची जादू आजही कायम आहे. तिच्या छायाचित्रांना, पेंटिंगना आजही मोठीच मागणी असते. आताही तिच्या एका पेंटिंगला 195 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1500 कोटी रुपयांहूनही अधिक किंमत मिळाली आहे(500 crores to Marilyn Monroe painting).

    अँडी वॉरहॉल या चित्रकाराने मर्लिन मुन्रो यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी म्हणजेच 1964 मध्ये हे पेंटिंग बनवले होते. या चित्राच्या लिलावातून मिळणारा निधी अनाथांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे. या पेंटिंगचे नाव ‘शॉट सेज ब्लू मर्लिन’ असे आहे. मॅनहॅटन येथील क्रिस्टिजच्या मुख्यालयात अवघ्या चारच मिनिटांत या कलाकृतीची पंधराशे कोटींपेक्षा अधिक किमतीत विक्री झाली. ही विसाव्या शतकातील सर्वांत महागडी कलाकृती बनली आहे. हे पेंटिंग कुणी विकत घेतले हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

    या पोर्ट्रेटच्या विक्रीतून मिळणारी रक्कम थॉमस अँड डोरिस अम्मन फाऊंडेशन (झुरिच)ला दिली जाईल. या फाउंडेशनचा मुख्य उद्देश अनाथ मुलांना चित्रकलेच्या माध्यमातून मदत करणे हा आहे. हे फाउंडेशन अनाथ मुलांना आरोग्यसेवा आणि शिक्षण देते.

    क्रिस्टिजच्या म्हणण्यानुसार विक्रीपूर्वी या पोर्ट्रेटची किंमत सुमारे 200 दशलक्ष डॉलर्स असण्याचा अंदाज होता. त्यापेक्षा थोड्या कमी किमतीत विकूनही या चित्राने विसाव्या शतकातील याबाबतचा विक्रम मोडला. यापूर्वी हा विक्रम पाब्लो पिकासोच्या ‘वूमन ऑफ अल्जियर्स’च्या नावावर होता. त्याची 2015 मध्ये 1385 कोटी (179.4 दशलक्ष डॉलर्स) विक्री झाली होती.