
Phones4u कंपनीचे सह-संस्थापक जॉन कॉडवेल यांच्या दुसऱ्या पत्नीने 27 मार्चला एका मुलीला जन्म दिला. त्यांनी इन्स्टाग्रामवर याविषयी घोषणा केली. जॉन कॉडवेल यांचं हे सातवं अपत्य आहे.
सगळ्यांना माहिती आहे की, वडील बनणं प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. वडील (Father Story) होण्याचं एक वय असतं, असं अनेकदा लोकांकडून सांगितलं जातं. मात्र जगात असेही काही लोक आहेत जे तारुण्यात नव्हे तर वृद्ध झाल्यावरसुद्धा पितृत्वाचा आनंद उपभोगत आहेत. (Viral News) एका अरबपती माणसाच्या बाबतीत असंच घडलं आहे. त्यांची कथा इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे. हा माणूस वयाच्या 70 व्या वर्षी पिता (70 Year Old Man Became Father) झाला आहे. या माणसाविषयी आपण जाणून घेऊयात.
View this post on Instagram
अरबपतीच्या घरी आली छोटी परी
Phones4u कंपनीचे सह-संस्थापक जॉन कॉडवेल (John Caudwell) यांच्या दुसऱ्या पत्नीने 27 मार्चला एका मुलीला जन्म दिला. त्यांनी इन्स्टाग्रामवर याविषयी घोषणा केली. याआधी 2021 मध्ये त्यांनी एका मुलाला जन्म दिला होता. आता हे जोडपं नव्या मुलीच्या आगमनामुळे खूप आनंदी आहे. दोघांनी सांगितलं की, हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. या जोडप्याने आपल्या मुलीचं नाव सबेला असं ठेवलं आहे. जॉन कॉडवेल यांचं हे सातवं (Seventh Child Of John Caudwell) अपत्य आहे. या मुलीच्या जन्माच्या आधी त्यांना पहिल्या पत्नीपासून त्यांना जॅकोबी (वय -18 वर्ष), स्कारलेट (वय -20 वर्ष),रुफस (वय-25वर्ष), लिब्बी(वय-34वर्ष), रिबका (वय-42वर्ष) ही मुलं आहेत. आपल्या कुटुंबासह कॉडवेल 80 कोटींच्या आलिशान महालात राहतात.
अरबपतीची संपत्ती
जॉन कॉडवेल यांच्या उत्पन्नाचा एक भाग गुंतवणुकीसाठी वापरला जातो. त्यांनी रिअल इस्टेट आणि फॅशन यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली आहे. याशिवाय त्यांनी आपल्या संपत्तीपैकी 70 टक्के भाग हा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉडवेल यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं की, त्यांनी जीवनात अनेक अवघड प्रसंगांना तोंड दिलं आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. मात्र 35 व्या वर्षी त्यांच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळाली. कारण त्याच काळात त्यांनी मोबाइल व्यवसायात प्रवेश केला आणि त्यांचं नशीब फळफळलं.