
दिल्लीत मेट्रोतून प्रवासी प्रवास करीत असतांना अचानक भुलभुलैया सिनेमातील हॉरर पात्र मंजूलीकाच्या वेशात एक तरुणी पुढे आली आणि मंजुलीकाप्रमाणे बंगालीत संवाद करु लागली.
2007 मध्ये आलेला भूल भुलैया (Bhulbhulaiya) चित्रपट नसेल पाहिला असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. या सिनेमातील अभिनेत्री विद्या बालन ने साकारलेली मंजुलिका (Manjulika)आणि तिचा तो डान्स अजूनही लोकांच्या लक्षात आहे. भितीदायक वाटणारी ती मंजुलिका प्रत्यक्षात जरी आली तर असा विचार केला तरी भिती वाटू शकते. पण ही मंजुलिका खरचं लोकांसमोर आल्याचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मेट्रो ट्रेनमधला असून मंजुलिका सारख्या तयार होऊन आलेल्या या मुलीने ट्रेनमधील लोकांना चांगलच घाबरवलं. नेमका काय आहे हा प्रकार पाहुया.
मेट्रोत आली मंजुलिका
दिल्लीत मेट्रोतून प्रवासी प्रवास करीत असतांना अचानक भुलभुलैया सिनेमातील हॉरर पात्र मंजूलीकाच्या वेशात एक तरुणी पुढे आली आणि मंजुलीकाप्रमाणे बंगालीत संवाद करु लागली. तिला पाहताच लोकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. काही प्रवाशांनी घाबरुन जागा बदलल्या तर काहींनी हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. दिल्ली मेट्रोतील मंजूलीकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
View this post on Instagram